४जी देणार १.९ GBPS स्पीडने इंटरनेट!

internet
मुंबई: जगातील सर्वात फास्ट ४जी इंटरनेट स्पीड उपलब्ध करून दिल्याचा दावा फिनलँडच्या एका मोबाईल कंपनीने केला असून हा दावा एलिसा नावाच्या कंपनीने केला आहे. कंपनीला १.९GBPS स्पीड मिळाल्याचे चाचणी आढळल्याचे सांगितले आहे.

कंपनीच्या दाव्यानुसार, एक ब्ल्यू रे फिल्मला या इंटरनेटच्या स्पीडमध्ये फक्त ४४ सेकंदात डाऊनलोड केले जाऊ शकते. मात्र, यावर विश्लेषकांनी संशय व्यक्त केला असून कारण त्यांच्या मते, इंटरनेट स्पीड हा नेटवर्कच्या आधारे मिळतो. वास्तविक कंपनीने २ GBPS स्पीडसाठी हुवाई या चीनी कंपनीने बनवलेल्या तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याचे कंपनीने सांगितले आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये एका विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ५जी नेटवर्कवर टेराबाईटवर सेकंद (TVPS) चा स्पीड मिळवला होता.

Leave a Comment