युरोपियन महासंघाने अॅपलला ठोठावला ९६ हजार कोटीचा दंड

apple
ब्रसेल्स – युरोपियन महासंघाने तंत्रज्ञान क्षेत्रातील अमेरिकेची सर्वात मोठी कंपनी अॅपलला ९६ हजार कोटीचा दंड सुनावला. हा दंड गेली ११ वर्षे निर्धारित दरापेक्षा कमी प्रमाणात प्राप्तीकर दाखल केल्याच्या कारणास्तव सुनावण्यात आला. मोठय़ा प्रमाणात कंपनीने कराची बचत केली असा आरोप करण्यात आला.

महासंघाने साधारण तीन वर्षे या प्रकरणाचा तपास करत हा निर्णय दिला. अॅपलसाठी हा मोठा झटका असल्याचे सांगण्यात आले. आयर्लंड देशात विदेशी कंपन्यांना मोठय़ा प्रमाणात करात सवलत देत आपल्याकडे आकर्षित करत आहे. अॅपलने युरोपियन महासंघाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे महासंघाने म्हटले. आयर्लंडचे अर्थमंत्री मायकल नूनान यांनी अॅपलवरील आरोप फेटाळले आहेत. कंपनीला आतापर्यंत विविध देशांत करण्यात आलेल्या दंडापेक्षा ही रक्कम मोठी असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment