प्राचीन शहरी वस्ती गुजराथेत सापडली

dholveer
गुजराथच्या ढोलवीरा नावाच्या प्राचीन प्रदेशात ५ हजार वर्षांपूर्वीची प्राचीन शहरी वस्ती समुद्र प्राच्यविद्या संशोधकांनी शोधली असल्याचा दावा गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक एस डब्ल्यू ए नक्वी यांनी केला आहे. एका पत्रकार परिषदेत या विषयीची माहिती देताना ते म्हणाले की ढोलवीरा हा जगातल सर्वात जुना ज्ञात प्रदेश आहे. हडप्पा काळात हे आधुनिक शहर वसले असावे असा अंदाज आहे. त्सुनामीमुळे या शहराची वाताहत झाली असावी असाही दावा केला जात आहे. सध्या सापडलेले अवशेष किमान ३४५० वर्षांपूर्वीचे असावेत असेही अंदाज केले जात आहेत.

हडप्पा काळात ढोलवीरा हे सर्वात मोठे बंदर शहर मानले जात होते. पाच हजार वर्षांपूर्वी या शहराचे तीन हिस्से होते. त्याच किल्ला, मध्यवर्ती शहर व खालचे शहर असे तीन भाग होते. १४ ते १८ मीटर रूंदीच्या भिती हे या शहराचे वैशिष्ठ होते व या भिंती कदाचित त्सुनामीपासून शहराचे संरक्षण व्हावे यासाठीच उभारल्या गेलेल्या असाव्यात असेही या तज्ञांचे मत आहे.

Leave a Comment