पेट्रोल-डिझेलच्या दरात भरघोस वाढ

petrol
नवी दिल्ली – वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असताना तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असून पेट्रोलच्या दरांमध्ये ३.३८ रुपये प्रतिलीटर तर डिझेलच्या दरांमध्ये २.६७ प्रतिलीटर वाढ करण्यात आली आहे. निश्चितच या दरवाढीचा फटका ग्राहकांच्या खिशाला बसणार असल्यामुळे वाहनधारकांना पेट्रोल व डिझेलसाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. हे नवीन दर बुधवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. या दरावाढीच्या फटक्याला सर्वसामान्य जनतेला आता तोंड द्यावे लागणार आहे.

Leave a Comment