रिलायन्स १ रुपयात देणार ३०० कॉलिंग मिनिटे

reliance
नवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशनने कॉल ड्रॉप समस्येवर तोडगा म्हणून अॅप-टू-अॅप कॉलिंग ही नवी स्कीम लाँच केली असून कंपनी या स्कीममध्ये आपल्या दिल्ली-एनसीआरच्या ग्राहकांना अवघ्या १ रुपयात ३०० कॉलिंग मिनिटे उपलब्ध करुन देणार आहे. ज्याची वैधता ३० दिवसांपर्यंत असणार आहे.

या स्कीमला कंपनीने ‘कॉल ड्रॉपपासून सुटका’ असे नाव दिलं आहे. रिलायन्सचे बिजनेस सीईओ गुरदीप सिंह यांनी सांगितले की, दिल्ली-एनसीआरमधील ग्राहकांना भारतातील पहिल्या अॅप-टू-अॅप स्कीमचा फायदा मिळणार आहे. याची वैधता ३० दिवसांपर्यंत असणार आहे. अवघ्या १ रुपयात ग्राहकांना ३० दिवसासाठी दररोज १० मिनिटे कॉलिंग टाइम मिळेल. म्हणजेच तुम्ही १ रुपयात दररोज १० मिनिटाच्या हिशोबाने ३० दिवसांपर्यंत ३०० मिनिटे बोलू शकता. मात्र, ही डेटा कॉलिंग स्कीम आहे. म्हणजेच व्हॉट्सअॅप आणि कॉलिंग अॅपवरुन तुम्ही फोन कॉल करु शकता.

Leave a Comment