भारतात लॉन्च झाली मारूतीची नवी स्वीफ्ट डेका

swift
नवी दिल्ली: आपली नवी कोरी स्पोर्ट कार भारतात देशातील कार निर्मिती कंपनी मारूती सुझुकीने लॉन्च केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कार चाहते जबरदस्त लूक असलेल्या मारूती सुझुकी स्विफ्ट डेका या कारची वाट बघत होते. याआधी ही कार इंडियन ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये लॉन्च करण्यात आली होती. आता ही कार ग्राहकांसाठी बाजारात दाखल झाली असून या कारची किंमत ५.९४ लाख रूपये ऐवढी आहे.

स्विफ्टचे हे नवे स्पोर्ट लिमिटेड मॉडेल लाल आणि पांढ-या रंगात उपलब्ध आहे. कारचा बॉडी कर लाल ठेवण्यात आला असून यावर पांढ-या रंगांच्या पट्ट्या देण्यात आल्यामुळे कार स्पोर्टी आणि आकर्षक वाटते. तर साईड प्रोफाईलमध्ये १० नंबरची ब्रॅंडिंग केली गेली आहे. या १० नंबरमुळे ही कार अधिक आकर्षक दिसते. या कारच्या इंजिनमध्ये फार काही बदल करण्यात आला नाही. यात आधीसारखाच १.२ लीटरचे पेट्रोल इंजिन आणि १.३ लीटरचे डिझल इंजिन आहे. पेट्रोल इंजिन ८४.३ पीएसची पॉवर आणि ११५ एनएम टार्क देते. तर डिझल इंजिन ७५ पीएसची पॉवर आणि १९० एनएमचे टार्क निर्माण करते.

Leave a Comment