बिग बझार डायरेक्ट बंद होणार

big-bazar
फ्यूचर ग्रुप ने त्यांची महत्वाकांक्षी ऑनलाईन रिटेल व्हेंचर बिग बझार डायरेक्ट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१३ पासून बिग बझार डायरेक्टची सुरवात झाली होती व त्याच्या माध्यमातून १ हजारांहून अधिक फ्रंचाईजीसह ही ई कॉमर्स सेवा चालविली जात होती. या सेवेअंतर्गत ५० हजार फ्रेंचाईजी जोडण्याचा प्रयत्न फ्यूचर ग्रूपकडून केला जाणार होता असेही समजते.

फ्यूचर ग्रूपने आजपर्यंत चार वेळा ही ई कॉमर्स सेवा सुरू केली व बंद केली असल्याचेही सांगितले जात आहे. या सेवेसाठी ग्राहकांना जोडण्याचा येणारा खर्च व अन्य खर्च लक्षात घेतला तर व्यवसायाची वाढ अत्यंत मंद असल्याचे लक्षात आले होते.त्यामुळे ही सेवा वाढविण्याऐवजी रिटेलवरच अधिक फोकस करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याचे सांगितले जात आहे. एका वर्षात ३० लाख चौरस फूट जागा रिटेलसाठी घेतली जाणार असल्याचेही समजते.

Leave a Comment