केवळ ५०० रुपयांत या तुरुंगात होणार खातरदारी

jail
हैदराबाद- केवळ ५०० रुपयांत तेलंगणमधील मेडक जिल्ह्यात एक असा तुरुंग आहे जिथे तुमची खातिरदारी होते. संगारेड्डी भागात हा तुरुंग असून चक्क ५०० रुपयांमध्ये तुम्ही कोणताही अपराध केला नसताना तुरुंगाचा वापर करु शकता. तुरुंग प्रशासनाची परवानगी घेऊन तुम्ही एक दिवस तेथे राहु शकता. तुरुंगात असताना तुम्हाला कैद्याप्रमाणेच जेवण दिले जाते. खादीचे कपडे आणि जेवणाचे ताटही तुम्हाला दिले जाते. महिला आणि पुरुषांसाठी वेगळ्या सेल आहेत.

Leave a Comment