इस्त्रो एकाचवेळी करणार ६८ उपग्रहांचे प्रक्षेपण

isro
भारतीय अंतराळ संशोधन केंद्र इस्त्रोने पुढील वर्षात एकाचवेळी ६८ उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आखली असून सर्व सुरळीतपणे पार पडले तर पुढील वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांच्या काळात हे उपग्रह अवकाशात झेपावतील असे समजते.

इस्त्रोची सहयोगी संस्था अँट्रीक्स चे व्यवस्थापकीय संचालक राकेश शशीभूषण या संदर्भात माहिती देताना म्हणाले, इस्त्रो अनेक प्रक्षेपणे भविष्यात करणार आहे पण ही योजना विशेष आहे कारण यात एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत. यात विविध देशांचे नॅनो उपग्रहही असतील. यामुळे अंतराळ संशोधन कार्यात नवीन रेकॉर्डची नोंद होईल. यापूर्वी इस्त्रोने जूनमध्ये एकाचवेळी २० उपग्रह प्रक्षेपित करण्याची कामगिरी यशस्वी केली आहे.

Leave a Comment