सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार आयफोन ७

iphone-7
कॅलिफोर्निया : आपल्या नव्या इव्हेंटच्या तारखेची जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी अॅपलने घोषणा केली असून ‘अॅपल’चा यावर्षातील दुसरा इव्हेंट ७ सप्टेंबर रोजी होणार आहे. याच इव्हेंटमध्ये अॅपल कंपनी आपला बहुप्रतीक्षित ‘आयफोन ७’ किंवा ‘आयफोन ६एसई’ आणि अॅपल वॉच लॉन्च करण्याची शक्यता आहे. प्रेस इन्व्हाईटला अॅपल कंपनीने ‘See you on the 7th’ असा मथळा दिला आहे.

आधीच्या सर्व आयफोनपेक्षा अॅपलचा नवा आयफोन हा अधिक स्लिम असेल आणि अन्य फीचर्समध्येही थोडेफार बदल करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. नव्या आयफोनमध्ये ३.५mm ऑडिओ जॅक नसेल. शिवाय, वॉटर रेसिस्टंट फीचरमध्येही काही बदल करुन अधिक सुरक्षित बनवल्याचे बोलले जात आहे.

नेहमीच आपल्या चांगल्या कॅमेऱ्यासाठी आयफोन डिव्हाईस ओळखले जातात. हेच लक्षात घेऊन अॅपल कंपनी आयफोन ७ मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देऊ शकते. यावेळी कंपनी आपल्या बेस मॉडेल असलेल्या १६ जीबीमध्ये बदल करुन ३२ जीबी करेल. म्हणजेच आयफोन ७ कमीत कमी ३२ जीबी व्हेरिएंट असेल.

Leave a Comment