शंभर वर्षाच्या भारतीय आजीनी अमेरिकेत जिंकले सुवर्णपदक

ajji
व्हँक्यूव्हर येथे सोमवारी पार पडलेल्या अमेरिकन मार्स्टर्स गेम स्पर्धेत भारताच्या शंभरी पार केलेल्या आजीबाई मनकौर यांनी १०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. हे अंतर तोडायला त्यांना ८१ सेकंद लागले तरीही त्यांना सुवर्णपदक मिळाले कारण त्यांच्या वयोगटात त्या एकट्याच स्पर्धक होत्या. आजीबाईंनी फिनिशिंग लाईन क्रॉस केली तेव्हा त्यांना अभिवादन करण्यासाठी ७० ते ८० वयोगटातील अनेक स्पर्धक उभे होते.

मनकौर यांनी स्पर्धा जिंकताच त्यांच्या ७८ वर्षीय मुलाने गुरदेवसिंग यांनी आईचे अभिनंदन तर केलेच पण त्यांच्या यशाची कथा भारतात परतल्यावर सर्वांना सागण्यास उत्सुक असल्याचेही सांगितले. स्पर्धा जिंकताच मनकौर यांनी दोन्ही हात उंचावून लोकांना अभिवादन केले कारण त्यांना दम लागल्याने बोलणे अशक्य झाले होते. यापूर्वी भालाफेक व शॉट पुट या खेळातही त्यांनी पदके जिंकली आहेत.

गुरदेवसिंग म्हणाले आईने ९३ व्या वर्षी पळण्याची सुरवात केली. गुरदेव यांनीच त्यांना त्यासाठी प्रोत्साहन दिले होते. गुरदेवसिंग सांगतात, आईला गुडघेदुखी अथवा हृदयाचा आजार नाही त्यामुळे मीच तिला पळणे सुरू करायला सांगितले. अमेरिकेतील ही स्पर्धा किमान ३० वय असलेल्या खेळाडूंसाठी असते. यंदाच्या स्पर्धेत खेळाडूंचे सरासरी वय ४९ वर्षे होते. या स्पर्धेत निहाल गील नावाचे १०१ वर्षाचे स्पर्धकही सहभागी झाले होते.

Leave a Comment