बंदर हिरा खाणीचा सरकार करणार लिलाव

diamond
मध्यप्रदेशातील बंदर हिरा खाणीचा केंद्र सरकार लवकरच लिलाव करणार असल्याचे समजते. जागतिक खाण कंपनी रिओ टिंटो ने या हिरा खाणीचा शोध २००४ मध्ये लावला होता व या खाणीसाठी ५५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणुकही केली होती. मात्र या कंपनीचा नफा यंदा प्रचंड प्रमाणात घसरला असून गेल्या १२ वर्षात ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यामुळे यापुढे कंपनीला येथे आणखी गुंतवणूक करणे शक्य होणार नसल्याने या वर्षअ्खेर ही खाण रिओ टिंटो सरकारला परत करणार असल्याचे समजते.

या खाणीत २७.४ दशलक्ष कॅरेटचे हिरे असावेत असा अंदाज आहे. त्यांची किमत अब्जावधी डॉलर्स होते. केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयाकडून सांगितले गेले की या खाणीत जे गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू केली गेली आहे. खाणी संदर्भातला डेटाही त्यांना पाहता येणार आहे.

Leave a Comment