या कालीमातेला फुटतो घाम

kalimata
मध्यप्रदेशातील जबलपूर येथे कालीमातेचे एक प्राचीन मंदिर आहे. तशी भारतात कालीमातेची शेकडयाने मंदिरे असतील पण या मंदिराचे खास वैशिष्ठ आहे. हे मंदिर ऐतिहासिक तसेच चमत्कारी म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे आपल्या डोळ्यादेखत अशी घटना घडते की त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा मार्गच राहात नाही.

अ्से सांगतात या मंदिरातील कालीमातेची प्रतिमा भव्य आहे व ती किमान ६०० वर्षे जुनी आहे. या मंदिराची स्थापन गोंडवन साम्राज्य काळात झाली असल्याचेही सांगितले जाते. या कालीमातेला उकाडा अजिबात सहन होत नाही. जरा हवा तापली की मूर्तीला घाम येऊ लागतो व वारंवार पुसूनही घाम येत राहतो. अलिकडेच या मंदिरात अनेक एसी बसविले आहेत. मात्र कांही कारणाने एसी बंद पडले की कालीमातेची मूर्ती घामाघूम होऊ लागते. अनेक वैज्ञानिक, संशोधकांनी येथे भेट देऊन त्यामागचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्याचे उत्तर अजून तरी कुणाला मिळालेले नाही.

Leave a Comment