दिल्लीत वाहन उद्योगाला आठ महिन्यांमध्ये ८००० कोटींचा तोटा

diesel
नवी दिल्ली : डिझेलवर चालणाऱ्या २००० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या वाहनांच्या विक्रीवरील राजधानी दिल्लीत बंदीच्या निर्णयामुळे वाहन उद्योगाला आठ महिन्यांमध्ये तब्बल ८००० कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे (सियाम) अध्यक्ष विनोद दसरी यांनी दिली.

सरकारी नियमांनुसार चालणाऱ्या या वाहनांवर न्यायालयाला अनुचित माहिती पुरविण्यात आल्याने बंदी लागू झाली व प्रदूषणाचे मूळ कारण न शोधताच वाहन उद्योगावर नियमन केले जात आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. ऑटोमोटिव्ह कम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (एसीएमए) ५८ व्या वार्षिक सत्रात ते बोलत होते.

सरकारी नियमांना अनुसरुन तयार झालेल्या वाहनांवरच माध्यमांमधील गाजावाजा आणि न्यायालयाला मिळालेल्या अनुचित माहितीमुळे बंदी घालण्यात आली. सरकारी नियमांचे पालन करुनदेखील दंड भरावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या आठ महिन्यांमध्ये वाहन उद्योगाला ८००० कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दसरी म्हणाले.

Leave a Comment