जीपच्या रँग्लर आणि ग्रॅन्ड चेरकी भारतात दाखल

jeep
मुंबई : अखेर पुन्हा एकदा भारतात मोठ्या कार बनवण्यासाठी ओळखली जाणारी अमेरिकेची ‘जीप’ दाखल झाली आहे.

भारतात आपल्या दोन फ्लॅगशिप गाड्या पॉप्युलर ब्रॅन्ड असलेल्या जीपने रँग्लर आणि ग्रॅन्ड चेरकी लॉन्च केल्या आहेत. ‘जीप’ने भारतात जवळपास ७० वर्षानंतर रिएन्ट्री घेतली आहे. या अगोदर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जीप विक्रीसाठी भारतात दाखल झाली होती. तीन वर्षांपूर्वीही जीपने आपण भारतात दाखल होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता कंपनीने जोधपूरमध्ये आपली ग्लोबल फ्लॅगशिप एसयूव्ही रँग्लर आणि ग्रॅन्ड चेरकी लॉन्च केली. रँग्लरची किंमत ७१.५९ लाख रुपये तर ग्रॅन्ड चेरकीची किंमत ९३.६४ लाख रुपयांपासून (एक्स शोरुम किंमत, दिल्ली) सुरू होते.

Leave a Comment