परदेशी महिला पर्यटकांसाठी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची नियमावली

mahesh-sharma
नवी दिल्ली – केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी भारतात पर्यटकांची संख्या अधिक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अजब वक्तव्य केले आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मांनी परदेशी महिला पर्यटकांनी स्कर्ट घालू नये, तसेच रात्री एकट्याने बाहेर पडू नये, असा अजब सल्ला दिला आहे. पर्यटकांनी एअरपोर्टवर कसे वागावे, याच्या नियमावलीची पुस्तिका पर्यटकांना दिली जात आहे. या पुस्तिकेतही परदेशी महिला पर्यटकांना हे सल्ले देण्यात आले आहेत. या वक्तव्यानंतर महेश शर्मा यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

परदेशी पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेता काही सूचना दिल्या आहेत. एअरपोर्टवर ज्या कोणत्या टॅक्सीमध्ये बसाल, त्या टॅक्सीचा नंबर आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवून ठेवा, अशी सूचनाही महेश शर्मा यांनी दिली आहे. महेश शर्मा यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी सारवासारव केली की, कपड्यांवरुन कोणताही सल्ला दिलेला नाही. मात्र, पर्यटकांना देण्यात येणाऱ्या वेलकम किटमध्ये भारत विविध संस्कृतींचा आणि मंदिरांचा देश असल्यामुळे त्यानुसारच कपडे परिधान करावे असे म्हटले आहे.

भारतात आल्यावर परदेशी पर्यटकांनी काही गोष्टी पाळाव्यात. एअरपोर्टवरून निघताना ज्या टॅक्सीमध्ये बसाल, त्या टॅक्सीच्या नंबरप्लेटचा फोटो काढून, तो आपले मित्र वा नातेवाईकांना पाठवून ठेवावा. छोटी गावे वा शहरात रात्री-अपरात्री एकट्याने फिरू नये, (महिलांनी) स्कर्ट्स घालू नये, अशा सूचना त्या किटमध्ये असल्याचे शर्मा यांनी सांगितले. मात्र पर्यटकांना पेहेरावावरून देण्यात आलेली ही सूचना सर्वांनाच रुचलेली नसून त्यांच्यावर टीका करण्यात येक आहे. त्यानंतर शर्मा यांनी सारवासारव करत, आपण कोणालाही कपड्यांवरून सल्ला दिलेला नसल्याचे स्पष्ट केले.

Leave a Comment