रेल्वेच्या पासवर आता करा मनसोक्त शॉपिंग

shopping
मुंबई : यापुढे तुम्हाला तुमच्या रेल्वेच्या पासवर शॉपिंग करता येऊ शकेल. कारण रेल्वेच्या पासचे क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये रुपांतर करण्याची रेल्वेची योजना असून रेल्वेने ‘रेल्वे पास काढा आणि शॉपिंग करा’ अशी भन्नाट संकल्पना पुढे आणली आहे. यासंदर्भात देशातील ३१ बँकांशी रेल्वेची बोलणी सुरु आहे.

प्रवाशांना नव्या संकल्पनेनुसार गोल्ड, सिल्व्हर आणि प्लॅटिनम अशा तीन प्रकारची कार्ड उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. महिना, तीन महिने किंवा सहा महिने मुदतीच्या पासवर ही योजना लागू करण्याचा रेल्वेचा विचार असल्यामुळे लवकरच शॉपिंगसाठी तुमचा रेल्वे पास पुरेसा असणार आहे.
एचडीएफसी, आयसीआयसीआय, स्टेट बँक ऑफ इंडिया यांसह जवळपास ३१ बँकांशी रेल्वेच्या या योजनेसाठी चर्चा सुरु असल्याचीही माहिती मिळते आहे.

1 thought on “रेल्वेच्या पासवर आता करा मनसोक्त शॉपिंग”

Leave a Comment