मोटोरोलाचा ‘ई’ सिरीजचा E3 पॉवर लाँच

motorola
मुंबई – आपल्या ई सीरीजमधला आतापर्यंतचा सर्वात स्वस्त व आधुनिक फिचर्स असलेला मोटो E3 पॉवर हा स्मार्टफोन मोटोरोलाने लाँच केला आहे. तथापि हा स्मार्टफोन भारतात अद्याप लाँच करण्यात आलेला नाही. या स्मार्टफोनचा टीझर मोटोरोला इंडियाच्या ट्वीटर हँडलवरून लाँच करण्यात आला आहे.

हाँगकाँगमध्ये मोटोरोलाने मोटोरोला E3 पॉवर या स्मार्टफोनची विक्री सुरू केली आहे. त्यानंतर लगेच त्यांच्या भारतातील ट्वीटर हँडलवर या नव्या मॉडेलचा टीजर जारी करण्यात आला.

गेल्याच महिन्यात यूकेमध्ये मोटोरोला E3 पॉवर हा लाँच करण्यात आलेल्या मोटो E3 या स्मार्टफोनचे अपग्रेडेड व्हर्जन आहे. भारतात आता मोटो E3 च्या ऐवजी थेट मोटो E3 पॉवर हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. भारतात मोटो जी च्या अभूतपूर्व लोकप्रियतेनंतर मोटो E आणि मोटो E2 हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले होते. मोटो जी च्या तुलनेत खूपच कमी किंमत असल्यामुळे त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता मोटो ई सीरिजमधल्या मोटो E3 पॉवर या नव्या व्हर्जनची भर पडणार आहे.

Leave a Comment