तरूणाईत ट्रॅव्हल टॅटूची क्रेझ

tattu1
प्रवास किवा मुक्त भटकंतीची आवड नसलेला माणूस शोधावाच लागेल. पर्यटनाची खास आवड असणारे वेडे त्यांच्या कांही सवयींमुळे पटकन नजरेत भरतात त्यात आता बॅगपॅक म्हणजे केवळ एखादी खांद्याला लावायची बॅग घ्यायची, अगदी जरूरीचे सामान घ्यायचे आणि जग हिंडायला बाहेर पडायचे, कधी एकट्याने कधी दुकट्याने हा नवा ट्रेंड रूळत चालला आहे. आपले भटकंतीचे पॅशन दाखविण्यासाठी आजकाल तरूणाईत ट्रॅव्हल टॅटू गोंदविण्याची नवी क्रेझही आली आहे आणि ती वेगाने लोकप्रियही होते आहे. फॅशन परी फॅशन व भटकंतीचे पॅशन दुसर्‍याना दाखविण्यासाठी ही चांगली सोय झाली आहे.

tattu
ट्रॅव्हल टॅट्यूमध्ये क्लासिक डिझाईन्स जादा कॉमन असली तरी कंपास टॅट्यू, दिशादर्शक सिंपल टॅटू, कंपास व पॉकेट क्लॉक टॅटू, कंपास व मॅप टॅटू, नॉटिकल टॅटू व वाईल्ड लाईफ टॅटू सर्वाधिक लोकप्रिय आहेत. तरूणाई हातावर, खांद्यावर, छातीवर, पाठीवर असे टॅटू गोंदवून घेत आहे.या टॅटूमुळे भटकण्याची आवड व त्याबाबतच्या संबंधित भटक्याच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे दुसर्‍यांपर्यंत पोहोचविता येतात असे या तरूणाईचे म्हणणे आहे.

यात वाईल्डलाईफ टॅटू जरा किचकट आहेत. त्यात एकाच गोंदणात हत्ती, वाघ, गेंडे, चिते, घोडे यांच्याबरोबरच पाली, साप, असे जीवजंतूही गोंदविले जातात. हे टॅटू छातीवर, पाठीवर काढून घेण्याकडे अधिक कल दिसतो. कंपास व मॅप हेही लोकप्रिय आहेत. खांदा, बायसेप्स, छातीवर ते कोरले जातात तर कंपास व क्लॉक मध्ये मनगटी जुन्या घड्याळाची आकृती कंपास म्हणजे दिशादर्शकासह रेखाटली जाते.

Leave a Comment