डुकाटीने लाँच केली नवी एंडय़ुरो बाइक

ducati
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी नवी मल्टीस्ट्राडा १२०० ही बाइक प्रसिद्ध बाइक निर्माता कंपनी डुकाटीने लाँच केली आहे. या बाइकची दिल्ली एक्स शोरुम किंमत १७ लाख ४४ हजार रुपये असणार आहे.

या बाइकची क्षमता ३० लिटर ४५० किमीपर्यंत असणार आहे. त्याचबरोबर १६० बॉयलर हॉर्स पॉवर, १२०० टेस्टाट्रेटा डिटीव्ही इंजिन, टीएफटी डिस्प्ले यामध्ये कार्नरिंग एबीएस, डुकाटी ट्रक्शन कंट्रोल, राइड बाय वायर सिस्टिम, डुकाटी व्हील कंट्रोल आणि सेमी ऍक्टिव्ह डुकाटी स्कायहूक सस्पेंशन इवॉल्यूशन देण्यात आले असून क्रूज कंट्रोल, हँडस् फ्री इग्निशन असे फिचर देण्यात आले आहेत. बाइकमध्ये होल्ड कंट्रोल सिस्टिम देण्यात आले असून हे कंट्रोल ब्रेकिंग सिस्टिम आहेत. या बाइकमध्ये डुकाटी मल्टीमीडिया सिस्टिमही देण्यात आले आहे. या बाइकमध्ये स्मार्टफोन कनेक्ट करण्यासाठी, कॉल रिसिव्ह करणे, गाणी ऐकणे, इनकमिंग मॅसेजची सूचना देणे, राइडचा संपूर्ण डेटा रेकॉर्ड करणे अशा अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment