गतवर्षात देशात ३७ नवे मोबाईल उत्पादन प्रकल्प सुरू

ravi
दिल्ली- गतवर्षात देशात ३७ नवे मोबाईल उत्पादन प्रकल्प सुरू झाले असून त्यातून ४० हजार प्रत्यक्ष तर सव्वा लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाल्याचे केंद्रीय माहिती प्रसारण व कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. दिल्लीत इलेक्ट्रोप्रेन्युअर पार्कच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. या पार्कसाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी अनुदान दिले गेले आहे.

रविशंकर म्हणाले गेल्या वर्षात देशात ११ कोटी मोबाईल तयार झाले आत्तापर्यंत ही संख्या ६ कोटी होती. चीनच्या जिओनी, श्याओमी ने हैद्राबादेतील फॉक्सकॉनच्या प्रकल्पात मोबाईल उत्पादन सुरू केले आहे तर नोकिया, कार्बन, लावा, मायक्रोमॅक्स, इंटेक्स, जिवी,एमटेक या कंपन्यांनीही त्यांचे प्रकल्प सुरू केले आहेत. लेईको ही कंपनीही त्यांचा मोबाईल उत्पादन प्रकल्प मंगळवार पासून सुरू करत आहे. मोबाईल उत्पादनाबरोबर प्रॉडक्शन डिझाईनही तितकेच महत्त्वाचे आहे. इलेक्ट्राॅनिक क्षेत्रात नवीन उद्योजकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी सरकारने इलेक्ट्राॅनिक डेव्हलपमेंट फंडाद्वारे १० हजार कोटी रूपये उपलब्ध करून दिले असल्याचेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

भारत दरवर्षी ३ लाख कोटी रूपयांचे इलेक्ट्राॅनिक वस्तू आयात करतो. २०२० सालापर्यंत ही आयात शून्यावर आणण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रसाद यांनी नमूद केले.

Leave a Comment