आता ‘चॅम्पवन’ देणार ५०१मध्ये स्मार्टफोन

champone
मुंबई : भारतातील स्मार्टफोनप्रेमींमध्ये रिंगिंग बेल्सच्या ‘फ्रीडम २५१’ स्मार्टफोनने धुमाकूळ घातला. रिंगिंग बेल्सने अवघ्या २५१ रुपयांत स्मार्टफोन उपलब्ध करुन दिला. आता असाच पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी ‘चॅम्पवन’ कंपनी तयार झाली असून आपला ‘चॅम्पवन C1’ स्मार्टफोन या कंपनीने लॉन्च केला असून, या स्मार्टफोनची किंमत फक्त ५०१ रुपये आहे.

आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर चॅम्पवन कंपनीने स्मार्टफोनचे रजिस्ट्रेशनही सुरु केले आहे. मात्र, सध्या पेमेंटबाबत काही टेक्निकल इश्यू असल्याने रजिस्ट्रेशन काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. जे ग्राहक वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करतील, त्यांनाच फ्लॅश सेलमध्ये सहभागी होता येणार आहे. शिवाय, कॅश ऑन डिलिव्हरीचाही पर्याय कंपनीने दिला आहे.

‘चॅम्पवन C1’ स्मार्टफोनमध्ये ५ इंचाचा एचडी डिस्प्ले, ३GHz प्रोसेसर, २ जीबी रॅम, ८ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा, फिंगरप्रिंट सेन्सर, १६ जीबी इंटरनल स्टोरेज, ड्युअल सिम देण्यात आले असून हा फोन ४जी आहे.

स्मार्टफोन बाजारात नजर फिरवल्यास या फीचर्ससाठी तुम्हाला आजच्या घडीला किमान ६ ते ७ हजार रुपये मोजावे लागतात. मात्र, चॅम्पवन कंपनी याच फीचर्सचा स्मार्टफोन केवळ ५०१ रुपयांत देणार आहे. त्यामुळे स्मार्टफोनप्रेमींमध्ये ‘चॅम्पवन C1’ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, रजिस्ट्रेशनचा तांत्रिक अडथळा दूर होईपर्यंत ग्राहकांना या स्मार्टफोनची आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

Leave a Comment