अॅमेझॉन, फ्लिपकार्टला टक्कर देण्यासाठी स्नॅपडीलची नवी योजना

snapdeal-gold
मुंबई: आपल्या ग्राहकांसाठी ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट ‘स्नॅपडील’ने खास योजना आणली असून ‘स्नॅपडील गोल्ड’ या नव्या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच आपल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनने अशा योजना सुरु केल्या आहेत. त्यांच्या ‘फ्लिपकार्ट प्लस’ आणि ‘अमेझॉन प्राईम’ या योजना आहेत. यामध्ये ग्राहकांना मोफत शिपिंग, फ्री नेक्स्ट डे डिलिव्हरी तसेच ऑफरमध्ये प्राधान्य मिळते.

‘स्नॅपडील गोल्ड’ ही योजना देखील तशीच असून यामध्ये ग्राहकांना कोणतीही वार्षिक रक्कम भरावी लागणार नाही. ही योजना पूर्णपणे मोफत असणार आहे. पण ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे.

Leave a Comment