चीनच्या रस्त्यांवर भीक मागतो आहे एक कोट्याधीश !

beggart
बीजिंग : चीनच्या रस्त्यांवर एक कोट्याधीश भिकारी दिसत आहे. तो कोट्याधीश असताना का भीक मागतो आहे? असा साहजिकच तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर, या श्रीमंत व्यक्तीचा मूळचा धंदाच ‘भीक मागणे’ हा आहे. भीकेतूनच तो महिन्याकाठी भरघोस कमाईही करतो. त्याने रस्त्यावर बसून भीक मागून चीनच्या राजधानीत म्हणजेच बीजिंगमध्ये स्वत:ची एक इमारतही उभी केली आहे.

एवढेच नाही तर तो दर महिन्याला आपल्याकडे साठलेले पैसे पोस्ट ऑफीसमध्ये जमा करतो. यासाठी तो साठलेले सगळे पैसे पोस्ट ऑफिससमोर असलेल्या फरशीवर टाकतो. आणि पैसे मोजण्यासाठी मदत करणाऱ्यांना तो मोठी टीपही देतो.

Leave a Comment