छोटय़ा व्यावसायिकांना मिळणार १० लाखांपर्यंत स्वस्त कर्ज

currency
नवी दिल्ली – छोटय़ा व्यावसायिकांना कर्ज घेणे पुढील काही दिवसांत सोपे जाणार असून १० लाखापर्यंत कर्ज या योजनेनुसार व्यावसायिकांना स्वस्त व्याजदरांने देण्यात येईल. छोटय़ा व्यावसायिकांना स्वस्त कर्ज देण्यासाठी एमएसएमई मंत्रालय आणि आरबीआय यांच्यात सध्या चर्चा सुरू असून या योजनेनुसार पेडिट गॅरन्टी योजनेत बदल करण्याची शक्यता आहे. आता क्रेडिट गॅरन्टी योजनेत व्यावसायिकांना एक कोटीपर्यंत कर्ज कोणत्याही गॉरन्टीशिवाय देण्यात येते. याच कर्जासाठी १२-१५ टक्क्यांचे व्याज द्यावे लागते.

आता क्रेडिट गॅरन्टी योजनेनुसार व्यावसायिकांना कोणत्याही कोलॅट्रलने कर्ज देण्यात येते. मात्र या कर्जासाठी व्याजदर जास्त प्रमाणात आकारण्यात येते. नव्या प्रस्तावानुसार जे व्यावसायिक कर्जावर कोलॅट्रल देऊ शकतात, त्यांना कमी व्याजदराने कर्ज देण्यात यावे. याव्यतिरिक्त कर्ज प्रस्तावाला भविष्यात धोका पाहत क्लियर करण्यात यावे. सध्या प्रचलित असणारी जुने रेकॉर्ड पाहून कर्ज मंजूर करण्याची योजना बंद करण्यात येईल. आयबीआय यासाठी स्टार्टअपना कर्ज देण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करणार आहे.

कर्ज प्रस्तावांना भविष्यातील धोका पाहता मंजूर करण्यात आल्याने कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. यामुळे खासकरून १ कोटीपर्यंत कर्ज देणे सोपे जाईल. सध्या काही स्टार्टअप कर्जाला गॅरन्टी देऊ शकत नाहीत, त्यांना कर्ज घेणे सोपे जाणार आहे. या व्यवसायांचे कोणतेही जुने रेकॉर्ड नसते. यामुळे बँका त्यांचे प्रस्ताव फेटाळतात असे समोर आले होते.

Leave a Comment