चालकरहित टॅक्सी सेवा सिंगापूरमध्ये सुरू

taxi
जगातली पहिली चालकरहित टॅक्सी सेवा सिंगापूरमध्ये गुरूवारपासून सुरू झाली आहे. सध्या ही सेवा कांही ठराविक भागातच सुरू केली गेली असून तेथे परिक्षणे केली जात आहेत. रोबो टॅक्सी सर्व्हीस नावाने सुरू झालेल्या या सेवेसाठीचे सॉफ्टवेअर अमेरिकन कंपनी न्यूटोनॉमी यांनी केले आहे. स्मार्टफोन अॅपवरून या टॅक्सीसाठी प्रवासी बुकींग करू शकणार आहेत.

न्यूटोनॉमीचे कार्यकारी प्रमुख कार्ल लागनेमा या संदर्भात म्हणाले की सध्या सिंगापूरच्या थोड्या भागासाठी ही सेवा सुरू केली आहे. येथील प्रवाशांचे अनुभव, व सेवेसंदर्भातील सूचना जाणून घेण्याची ही संधी आहे. २०१८ सालापर्यंत संपूर्ण देशभर ही सेवा सुरू केली जाणार आहे. या सेवेसाठी सध्या वापरल्या जात असलेल्या सहा टॅक्सी रेनॉ जॉय व मित्सुबिशीच्या आय एमआयइव्ही या इलेक्ट्रीक कार आहेत. त्या ४ किमीच्या परिसरात ही सेवा देणार आहेत. या टॅक्सी स्वतःच चालणार्‍या आहेत मात्र सध्या प्रवासात कांही अडचण आली तर खबरदारी म्हणून कंपनीचे अभियंते तैनात केले गेले आहेत.

Leave a Comment