सुब्रतो रॉय भरणार अजून ३०० कोटी

subrato-roy
नवी दिल्ली – सेबीकडे आणखी ३०० कोटी रुपयांचा भरणा करण्याची सहारा या वित्तकंपनीचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांनी तयारी दर्शविली असून मात्र बँक हमी म्हणून ही रक्कम स्वीकारावी अशी त्यांची अट आहे. आर्थिक गैरप्रकारांच्या आरोपांखाली सध्या त्यांच्यावर अभियोग सुरू असून सध्या ते पेरॉलवर कारागृहाबाहेर आहेत. त्यांच्या पेरॉलचा कालावधी १५ सप्टेंबरपर्यंत आहे. त्यांनी आतापर्यंत ३००.६८ कोटी रुपये सेबीकडे भरले असून ऊर्वरीत रक्कम जमा करण्यासाठी त्यांना पेरॉल वाढवून देण्यात आला होता.

Leave a Comment