रेल्वे देणार केवळ ९२ पैशांत १० लाखांचा विमा

railway
नवी दिल्ली- रेल्वे विभागाने केवळ ९२ पैशात दहा लाख रुपयांचा विमा मिळण्याची योजना सुरू केली आहे. या योजनेचा जगातील सर्वात स्वस्त विमा योजना म्हणून गौरव होईल अशीच ही योजना आहे.

ऑनलाइन तिकीट बुकिंग केल्यानंतर ९२ पैशांमध्ये १० लाखांचा विमा मिळेल असे भारतीय रेल्वेने म्हटले आहे. प्रवाशांना या योजनेचा फायदा ३१ ऑगस्टपासून मिळणार आहे. रेल्वेनी श्रीराम जनरल इंश्युरंस कंपनी, आईसीआईसीआई लोम्बार्ड जनरल इंश्युरंस कंपनी आणि रॉयल सुंदरम जनरल इंश्युरंस कंपनी यांच्याशी करार केले आहेत.

रेल्वेचे तिकीट बुक केल्यानंतर ९२ पैसे देऊन या तीन कंपन्यांपैकी एका कंपनीला निवडावे लागेल. विशेष म्हणजे, जे प्रवासी मासिक तत्वाचा पास काढतात त्यांच्यासाठी सुद्धा ही योजना आहे परंतु त्यांना वर्षाला पाससोबत २००-३०० रुपये जास्त द्यावे लागतील असे रेल्वेनी म्हटले आहे.

तिकीट विकत घेतानाच तुम्हाला तुमच्या नॉमिनीचे नाव द्यावे लागेल. ही जगातील सर्वात स्वस्त विमा योजना आहे की नाही याबाबत अजून आकडेवारी उपलब्ध नसली तरी अत्यंत कमी प्रिमियम भरून १० लाख भरपाई मिळेल अशी ही पहिलीच योजना असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Leave a Comment