रामदेवबाबांच्या पतंजलीची पूजा सामान क्षेत्रात एंट्री

madhuram
टूथपेस्ट, तेले, नूडल्स, बिस्कीटे अशी विविध उत्पादन क्षेत्रे काबीज केल्यानंतर योगगुरू रामदेवबाबा यांच्या पतंजलीने पूजा सामान क्षेत्रात उतरत असल्याची घोषणा केली असून पतंजली आस्था या नावाने हा ब्रँड बाजारात पुढील दोन महिन्यातच दाखल होत असल्याचे समजते. या ब्रँडखाली १०० पेक्षा अधिक उत्पादने बाजारात आणली जाणार आहेत. त्यात अगरबत्ती, धूप, तांब्याचे दिवे अशा पूजेसाठी लागणार्‍या अ्नेक वस्तूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे या क्षेत्राच्या वाढीचा वेग जबदरस्त आहे आणि अमेझॉनसह अनेक नामवंत कंपन्या या बाजारात आजघडीला व्यवसाय करत आहेत. देशात केवळ उदबत्ती बाजाराची उलाढालच २० हजार कोटींची असल्याचे सांगितले जात आहे. पैकी २५०० कोटींचा बाजार हा संघटीत आहे.

कंपनीचे प्रमुख बाळकृष्ण या संदर्भात माहिती देताना म्हणाले पूजा साहित्य क्षेत्रात आज अनेक कंपन्या आहेत मात्र त्यांच्या उत्पादनांत केमिकल्सचा वापर केला जातो.ग्राहकांना यामुळे अपाय होऊ शकतो. नैसर्गिक उत्पादनांमुळे मात्र ही भीती राहात नाही. आमची उत्पादने नैसिर्गिक पदार्थांपासूनच बनविली जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पतंजलीने सध्या १५०० वितरकांबरोबर बोलणी केली आहेत म्हणजेच किमान ३ लाख स्टोअर्समध्ये त्यांचा माल उपलब्ध होऊ शकणार आहे. वितरण शुभकार्ट ऑनलाईन मार्केट प्लेसच्या माध्यमातून केले जाणार आहे. शुभकार्ट आध्यात्म, धार्मिक संदर्भातली उत्पादने विकणारे मोठे मार्केट आहे.

Leave a Comment