ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘मिंत्रा’चे बॉयकॉट

myntra
मुंबई – शुक्रवारी सकाळपासून ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘मिंत्रा’ला बॉयकॉट करण्याची चर्चा सुरु झाली असून सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ट्विटरवर #BoycottMyntra असा ट्रेंडही पहायला मिळाला. ‘मिंत्रा’ वेबसाईटला लोकांनी बॉयकॉट करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘मिंत्रा’वर एका ग्राफिक्सच्या माध्यमातून द्रौपदीला वस्त्रहरणमधून वाचविण्यासाठी श्रीकृष्ण हा ‘मिंत्रा’च्या वेबसाईटवरुन साड्या खरेदी करत असल्याचे दाखविण्यात आले आहे.

हे ग्राफिक्स एका ट्विटर युझरने ट्विटरवर शेअर केले आणि ‘मिंत्रा’ शॉपिंग वेबसाईटकडून स्पष्टीकरण मागितले. यानंतर हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले आणि युझर्सने #BoycottMyntra हा हॅशटॅग वापरत ट्विट करण्यास सुरुवात केली. यामुळे ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट ‘मिंत्रा’ला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला आणि ‘मिंत्रा’वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मीडियात करण्यात येऊ लागले आहे.

पण, ‘मिंत्रा’ वेबसाईटवर दाखविण्यात आलेल्या या जाहिरातीचा आणि ‘मिंत्रा’चा काही संबंध नसल्याचे वृत्त आहे. ट्विटर युझर्सने टीका करण्याचं सुरु केल्यानतंर ‘मिंत्रा’ वेबसाईटने आपले स्टेटमेंट जारी करत म्हटले आहे की, आम्ही हे आर्टवर्क तयार केलेले नाही आणि इंडॉर्सही केले नाही. या ग्राफिक्स जाहिरातीला स्कॉल ड्रॉल नावाच्या एका वेबसाईटने फेब्रुवारी महिन्यात एक आर्टवर्क रिलीज केले होते. या सर्व प्रकारानंतर स्क्रोल ड्रॉलने ट्विट करत म्हटले आहे की, आम्ही या आर्टवर्कची जबाबदारी घेतो, मिंत्राचा याच्याशी कुठलाही संबंध नाही.

Leave a Comment