एल अॅन्ड टीच्या नाईक यांनी ७५ टक्के संपत्ती केली दान

naik
पुढच्या वर्षात एल अॅन्ड टी कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून निवृत्त होत असलेले ए.ए.नाईक यांनी त्यांच्या संपत्तीतील ७५ टक्के रक्कम दान करणार असल्याची घोषणा केली आहे. ईटी नाऊ न्यूजचॅनलवर एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ही घोषणा केली आहे.

या मुलाखतीत बोलताना नाईक यांनी चॅरिटी ही त्यांच्या घराण्याची परंपरा असल्याचे सांगितले. ते म्हणाले माझे आजोबा व वडील यांच्याकडे फारशी संपत्ती नव्हती व जी होती ती गरीबांच्या कल्याणासाठीच गेली. नाईक यांनी दोन धर्मादाय संस्था स्थापन केल्या आहेत. नाईक चॅटिेबल ट्रस्ट फॉर एज्युकेशन व स्कील ट्रेनिंग व निराली मेमोरियल मेडिकल ट्रस्ट या त्या दोन संस्था आहेत. निराली मेमोरियलची स्थापना त्यांच्या सात वर्षाच्या नातीच्या नावावरून केली गेली असून ही नात कॅन्सरने मृत्युमुखी पडली होती.

नाईक यांनी २०१० ते २०१६ या काळात २०० कोटीचे पॅकेज घेतले आहे मात्र अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यातील १२५ कोटी रूपये आत्तापर्यंत चॅरिटीसाठी खर्च केले आहेत. गुजराथेतील त्यांच्या मूळ गांवी हॉस्पिटल बांधण्यासाठी त्यांनीच पैसे दिले होते. १९९९ मध्ये ते कंपनीचे सीईओ होते व २००३ साली ते चेअरमन झाले आहेत. त्यांच्या ट्रस्ट कडून विविध सात प्रोजेक्टस हाती घेतले गेले आहेत. त्यात वैदीक स्कूलचाही समावेश आहे.

Leave a Comment