आकर्षक बॅगपॅक देईल स्टायलिश लूक

bagpack
कॉलेजकन्यकांसाठी आकर्षक दिसणे, स्टायलिश राहणे ही आवश्यक म्हणजे अगदी मस्ट अशी गोष्ट. नव्याने कॉलेज जॉईन केलेल्या मुली असोत अथवा कॉलेजात जाऊन दोनतीन वर्षे रूळलेल्या मुली असोत, त्यांना स्टाईल ही हवीच. मग ती वाढविण्यासाठी विविध प्रकारचे ड्रेसेस, अॅक्सेसरीज खरेदी केल्या जातात. मात्र तेवढचे आकर्षक स्टाईलसाठी पुरेसे नसते. आणखीही कांही गोष्टी तुम्हाला वेगळा व युनिक लूक देऊ शकतात व त्यात सध्या आघाडीवर आहेत विविध प्रकारचे बॅगपॅक.

कॉलेजमध्ये शिकण्यासाठी जायचे म्हणजे वह्यापुस्तके हवीतच. ती बरोबर बाळगायची तर बॅग हवी. मग ती ट्रेंडीलूकची असेल तर आपल्या स्टाईलमध्ये भर पडणारच. हे जाणून अनेक कंपन्यांनी विविध प्रकारच्या बॅगपॅक बाजारात आणल्या आहेत. कॅनव्हास,, रकसॅक, प्रिटेड, फ्लोरल, ज्यूट, स्लींग, क्रॉप अशा अनेक प्रकारच्या बॅगपॅक बाजारात आल्या आहेत. त्यामुळे निवडीला भरपूर वावही आहे. अनेक कंपन्यांनी त्यांची उत्पादने मल्टीकलर व स्टायलीश लूक देणारी बनविली आहेत. या बॅग केवळ स्टाईलच नाही तर फ्रेश लूकही देतात.

bagpack1
बाजारात चक्कर मारली असता असे दिसते की कॅनव्हस बेसवर फ्लोरल प्रिट व लेदर डिटेलिंग बॅगपॅक सध्या हॉट फेव्हरिट आहेत. अर्थात बॅगपॅक वापरताना मुलींचा सर्वसाधारण कल वनसायडेड बॅग्जवर अधिक असतो.पण या संदर्भात फिजिओतज्ञ असा सल्ला देतात की सतत अशा बॅग वापरण्याने मानदुखी, खांदादुखी, कंबर व मणक्यावर प्रेशर येऊन दुखणे सुरू होऊ शकते. याचे कारण म्हणजे वन सायडेड बॅगमुखे सर्व ओझे एकाच खांद्यावर येते व त्यामुळे पोश्चर बिघडते. तेव्हा स्टाईल करताना प्रकृतीकडेही ध्यान ठेवायला हवे. आरामदायक, सुविधाजनक व दोन्ही खांद्यावर समान वजन देणार्‍या बॅगपॅक त्यासांठी आदर्श आहेत.

Leave a Comment