आता केवळ पेट्रोलमध्येच उपलब्ध होणार मर्सिडिज

mercedes
नवी दिल्ली – मर्सिडिज बेन्झ या जर्मन लक्झरी कार कंपनीने भारतात आता केवळ पेट्रोल प्रकारातील गाडय़ा दाखल करण्याचा निर्णय असून हा निर्णय पुढील महिन्यापासून लागू होणार आहे. कंपनीने हा निर्णय डिझेल वाहनांमुळे हवा प्रदुषणात वाढ होत असल्याचे समोर आल्याने घेतला.

गुरुवारी कंपनीने भारतात एसयुव्ही प्रकारातील जीएलई ४०० हे मॉडेल दाखल केले. एक्स शोरुम दिल्लीतील या २९९६ सीसी क्षमता असणा-या पेट्रोल गाडीची किंमत ७४.९० लाख रुपये आहे. सध्या कंपनीच्या पेट्रोल कार विक्री २० टक्के असून ती ३० टक्क्यांपर्यंत जाईल अशी कंपनीला आशा आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच २००० सीसी आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या डिझेल कार आणि एसयुव्हीवरील बंदी मागे घेत १ टक्के पर्यावरण कर लादण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे विक्रीत घट होण्याबरोबर हा कर ग्राहकांवर न लादण्याचा निर्णय मर्सिडिज बेन्झ कंपनीने घेतला.

Leave a Comment