१०१ तासात २,१०० कपड्यांना इस्त्री करून रचला विश्वविक्रम

record
चेन्नई- आपले नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यासाठी लोक काय काय करतील याचा काही नेम नाही. दरम्यान असाच एक विक्रम तोडण्याचा यशस्वी प्रयत्न चेन्नईत झाला असला तरी अद्याप या विक्रमाची नोंद झाली नसली तर मागील विक्रम अगदी सहजरित्या तोडण्यात आला आहे.

या नव्या विक्रमवीराचे नाव डॅनियल सुंदर असे असून इंग्लंडच्या गॅरेथ सॅंन्डर्सचा रेकॉर्ड त्यांनी तोडला आहे. सॅन्डर्स यांनी सलग १०० तास कपड्यांना इस्त्री केली होती. त्यामध्ये त्यांनी २००० कपड्यांना इस्त्री केली होती. त्यांचा रेकॉर्ड सुंदर यांनी १०१ तास सलग इस्त्री करुन मोडला. यामध्ये त्यांनी तब्बल २,१०० कपड्यांना इस्त्री केली. याआधी, ऑस्ट्रेलियन जेनेट हेस्टिंग्स यांनी हा रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ते केवळ ८० तासच इस्त्री करू शकले होते.

Leave a Comment