हे मोबाईल असतील तरच मिळेल रिलायंस जिओची ४ जी ऑफर

reliance-jio
मुंबई: ९० दिवसांसाठी मोफत अनलिमिटेड ४जी इंटरनेट, अनलिमिटेड व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंग आणि एमएमएस रिलायंस जिओ ४जी प्रिव्ह्यू ऑफर अंतर्गत दिले जाणार असून ही ऑफर आता आणखी जास्त स्मार्टफोनवर सुरू होत असून या यादीत आता अ‍ॅसुस, टिसीएल आणि अल्काटेल कंपनीचे ४जी स्मार्टफोन सुद्धा जुळले आहेत. या ऑफरचा लाभ या स्मार्टफोनचे युजर्स घेऊ शकतील. सुरूवातीला ही ऑफर केवळ रिलायंसच्या लाईफ सिरीजच्या स्मार्टफोनसाठीच होती, मात्र नंतर सॅमसंग आणि एलजीपर्यंत ही ऑफर सुरू करण्यात आली. आता आणखी स्मार्टफोन जुळले आहेत.

रिलायंस जिओने सांगितले की, आता एकूण ९ स्मार्टफोन ब्रॅन्डसाठीही जिओ ४जी प्रिव्ह्यू ऑफर आहे. रिलायंस ४जी सीम हे केवळ ४जी स्मार्टफोनमध्येच काम करते. जर या यादीतील स्मार्टफोन तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. तुमच्याकडे ४जी स्मार्टफोन असेल तर आजच जाऊन तुम्ही या ऑफरची पूर्ण माहिती घेऊन तिचा लाभ घेऊ शकता. सध्या या ऑफरला ग्राहकांना जोरदार प्रतिसाद मिळत असून रिलायंस स्टोरमध्ये ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे.

४जी स्मार्टफोनची यादी:
सॅमसंग स्मार्टफोन – Grand Prime 4G, Galaxy J1, Galaxy J2, Galaxy J7, Galaxy J5, J5 (2016), J7 (2016), ON5 Pro, ON7 Pro, Galaxy S 5 Plus, Galaxy A5, Galaxy A7, Galaxy Core Prime 4G, Galaxy S6, Galaxy J3 (2016), ON7, Galaxy J2 Pro, Galaxy Note 7, Galaxy A8, Galaxy S6 Edge, ON5, Galaxy Note 5, Galaxy Note 4, Galaxy Alpha, Galaxy S6 Edge Plus, Galaxy Note 4 Edge, Galaxy Note 5 Duos, Galaxy S5 Neo, S7, Galaxy A5 (2016), Galaxy A7 (2016), S7 Edge, A8 VE, Galaxy J2 (2016), J Max, Galaxy A9, Galaxy A9 Pro, Galaxy C5, Galaxy C7

एलजी स्मार्टफोन – LGH630D (G4 Stylus 4G) & LGH 442 (LGC70 Spirit LTE), K332 (K7 LTE), K520DY (Stylus 2), K520DY, H860 (LG G5), K500I (X Screen), K535D (Stylus 2 Plus),

माइक्रोमॅक्स – Canvas Unite 4, Canvas Fire 6, Canvas Pulse 4G, Canvas Nitro 4G, Canvas Knight 2, Canvas 5, Canvas Evok, Canvas 6 Pro,Canvas 6, Canvas Blaze 4G, Unite 4 Pro, Canvas Play 4G, Canvas Amaze 4G, Unite 4 Plus, Canvas Fire 4G, Canvas Fire 4G plus, Canvas Xpress 4G, Canvas Blaze 4G Plus, Canvas Pace 4G, Canvas Mega 4G, Bolt Selfie, Canvas Mega 2, Canvas Sliver 5, Canvas Juice 4G, Canvas 5 Lite, Canvas 5 Lite Special Edition, Canvas Tab

Leave a Comment