दुसऱ्या महायुद्धात बुडालेले लढाऊ जहाज समुद्रात सापडले

ship
नवी दिल्ली : एका अशा विमानवाहक जहाजाचा शोध अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर सुरु असलेल्या अभियानात लागला आहे, जे दुसऱ्या महायुजद्धात वापरले गेले होते. हत्यार परिक्षणासाठी या हे जहाजाचा वापर केला जात होता.

अमेरिकेच्या विमानवाहक पोत ‘यूएसएस इन्डिपेंडेंस’ या जहाजाचे अवशेष प्रसिद्ध समुद्र वैज्ञानिकांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या या अभियानात मिळाले आहेत. जे ग्रेटर फॅरालोन्स नॅशनल मरीन सँक्चुअरी मध्ये समुद्रात अर्ध मैल आत आहे. समुद्राचा अभ्यास करण्यासाठी निघालेल्या नॉटिलस जहाजावर उपस्थित दोन वैज्ञानिकांनी दोन मानवरहित सबमर्सिबल समुद्राच्या तळाशी पाठवले. तेथे त्यांन एक एक हॅलकॅट लढाऊ विमान, विमानरोधी तोफ, दरवाजे आणि जहाजावर असलेलं नाव दिसलं. त्यांनी याचा एक व्हिडिओ देखील बनवला आहे.

Leave a Comment