दुकातीची मल्टीस्ट्राडा १२०० एन्डुरो सादर

dukati
इटलीच्या लग्झरी बाईक निर्मात्या दुकातीने त्यांची नवी मोटरबाईक मल्टीस्ट्राडा १२०० एन्ड्युरो भारतात सादर केली आहे. या बाईकची दिल्ली शो रूम किंमत १७ लाख ४४ हजार रूपये आहे. या श्रेणीच्या १२०० व १२०० एस मॉडेल्स पूर्वीपासूनच बाजारात आहेत मात्र भारतीय बाजारात ही बाईक उतरविण्यासाठी हीच वेळ योग्य असल्याचे कंपनीचे भारतातील प्रमुख रवि अलावूर यांचे म्हणणे आहे. या बाईकला युरो चार मानक इंजिन दिले गेले आहे.

रस्त्यावर तसेच खडकाळ भागातही सहजी चालू शकणारी ही बाईक ११९८ सीसी एल ट्विन टेस्टास्ट्रेटा डीव्हीटी इंजिनवर चालते. बाईकची इंधन टाकी ३० लिटरची आहे आणि ती ४५० किमी पर्यंतचा वेग गाठू शकते. एन्ड्युरो, स्पोर्ट, टूरिंग व अर्बन अशा चार रायडिंग मोडसमध्ये ती उपलब्ध करून दिली गेली आहे. याला ड्युअल सीट आहे मात्र ती अॅडजस्टिबल नाही.

Leave a Comment