ट्विटरवर मोदींनी बिग बीला पिछाडीवर टाकले

amit
देशातील सर्वाधिक फॉलोअर असलेल्या बॉलीवूडच्या शेहनशहाला म्हणजे बिग बीला पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ट्विटरवर पिछाडीवर टाकले आहे. बिग बीचे आजघडीला ट्विटरवर २ कोटी २० लाख फॉलोअर आहेत तर मोदींचे २ कोटी २१ लाख फॉलोअर झाले आहेत. जानेवरीत मोदींनी शाहरूखला मागे टाकून आघाडी घेतली होती मात्र जानेवारीपासून मोदींच्या अकौंटला फॉलो करणार्‍या नवीन फॉलोअरची संख्या घटली असल्याचेही सांगितले जात आहे.

गेल्या आठ महिन्यात मोदींना ५० लाख नवे फॉलोअर मिळाले आहेत याचाच अर्थ दर महिन्याला त्यांना ६.२१ लाख नवे फॉलोअर मिळाले आहेत. २००९ पासून मोदी ट्विटरवर अॅक्टीव्ह आहेत. अमेरिकेच्या बराक ओबामा यांच्यानंतर जगात सर्वाधिक संख्येने फॉलोअर मिळालेले मोदी दोन नंबरचे राजकीय नेते बनले आहेत. ओबामांच्या फॉलोअरची संख्या आहे ७ कोटी ६९ लाख. मोदींच्या ऑफिशिअल फेसबुक अकौंटवर देशात सर्वाधिक ३.५५ कोटी लाईक्स असून येथे दोन नंबरवर सलमान खान तर तीन नंबरवर दीपिका पदुकोन आहेत.

Leave a Comment