जाता जाता रघुराम राजननी दिला नवा तोहफा

upid
रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनरपद सोडताना रघुराम राजन यांनी ग्राहकांना यूपीआयएस चा तोहफा दिला आहे. यामुळे मित्र नातेवाईक यांच्या पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी बँक अकौंट असण्याची गरज संपुष्टात आली आहे. राजन यांनी कांही महिन्यांपूर्वीच ही योजना लाँच केली होती. त्यात देशभरातील २१ बँकांनी सहभाग घेतला असून तज्ञांच्या मते ही देशातील सर्वात सुरक्षित अशी बँकीगं सुविध ठरेल.

यापुढे ग्राहकांना यूपीआय आयडी नंबर घेऊन ईमेल, मोबाईल व आधार नंबरच्या सहाय्याने स्मार्टफोनवरून नातेवाईक, मित्र यांना पैसे ट्रान्स्फर करणे शक्य होणार आहे. शिवाय बिल पेमेंट, शॉपिग, नेट बँकींग यासाठी क्रेडीट, डेबिट कार्डाची आवश्यकताही भासणार नाही. युनिफाईड पेमेंट इंटरफेस सिस्टीम वापरण्यासाठी गुगलस्टोअर वरून युपीआय नावाचे अॅप युजरला डाऊनलोड करावे लागेल. व स्मार्टफोनवर ते रन करावे लागेल. ज्यांना पैसे पाठवायचे त्यांचा बँक अकौंट नंबर व आधार नंबर जोडून घ्यावा लागेल. या सुविधेखाली एका दिवसांत ५० रूपयांपासून ते १ लाख रूपयांपर्यंत पैसे पाठविता येणार आहेत.

Leave a Comment