मर्सिडीजची मेबॅक ६ इलेक्ट्रीक कार

maybach
मेर्सिडीजने त्यांची फ्यूचर मॉडेल व्हिजन मेबॅक सिक्स कार कॅलिफोर्नियातील पेबल बीचवर सादर केली आहे. ही लग्झरी कूपे कार लांबीला चक्क ६ मीटर आहे. म्हणजेच ए क्लास मर्सिडीज पेक्षाही ही लांबीला अधिक आहेच पण ती इलेक्ट्रीक कारही आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ती ५०० किमीचे अंतर तोडू शकते असा कंपनीचा दावा आहे

या कारला युनिक लूक दिला गेला आहे. गलविंग डोअर्स, स्प्लीट बॅकलाईट, बोट-टेल रियरमुळे ती आकर्षक दिसते आहे. प्रदर्शनातच तिने ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळविले आहे. या कारच्या प्रत्येक चाकासाठी १ मोटर दिली गेली आहे व त्यामुळे ७३८ हॉर्सपॉवरची ताकद निर्माण होऊ शकते. ० ते १०० किमीचा वेग घ्यायला या कारला फकत चार सेकंद लागतात आणि तिचा टॉप स्पीड आहे ताशी २५० किलोमीटर.

कारचे इंटिरियरही झकास केले गेले आहे. चालकासाठी मोठा टचस्क्रीन दिला गेला आहे तर विंड स्क्रीनवरही सर्व माहिती दिली गेली आहे. कारच्या सीट अत्यंत आरामदायी आणि महागड्या व्हाईट लेदरपासून बनविल्या गेल्या आहेत. सीटसाठी स्पेशल सेन्सर दिले गेले आहेत. यामुळे प्रवासी त्याच्या गरजेनुसार सीट सेट करू शकतात.कारची किंमत जाहीर केली नसली तरी तरी ही कार अंदाजे दोन कोटी रूपयात विकली जाईल असे सांगितले जात आहे.

Leave a Comment