बीएसएनएल देणार अमर्यादित ३ जी इंटरनेट

bsnl
नवी दिल्ली – बीएसएनएल या सरकारी मालकीच्या दूरसंचार कंपनीने आता आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी कंबर कसली आहे. फक्त १०९९ रुपयांत राष्ट्रीय पातळीवर अमर्यादित ३ जी मोबाइल प्लॅन सादर केला आहे. याव्यतिरिक्त सध्या सुरू असणा-या निवडक प्लॅन्समध्ये दुप्पट डाटा देण्यात येणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

कंपनीच्या जाळय़ामध्ये सुधारणा होत असल्याने गेल्या काही महिन्यात कंपनीची साथ सोडलेले ग्राहक पुन्हा सेवेचा लाभ घेत आहेत. दूरसंचार क्षेत्रात पहिल्यांदाच बीएसएनएलने अमर्याद ३ जी डाटा प्लॅन बाजारात आणला आहे. या प्लॅनची किंमत १०९९ रुपये असून यामध्ये वेगावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण कंपनीकडून ठेवण्यात येणार नाही. यामुळे कंपनीच्या ग्राहकांत आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे मत बीएसएनएलचे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक अनुपम श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.

Leave a Comment