२२ वर्षाखालील मुलांसाठी फेसबूकचे नवे अॅप

facebook
मुंबई: सध्या सोशल मीडियावर अग्रेसर असलेल्या फेसबूकच्या माध्यमातून विविध वयोगटातील कोट्यवधी लोक एकमेकांशी कनेक्ट आहेत. मात्र, आता फेसबुकने एक असे नवे अॅप लाँच केले असून, तिथे फक्त २२ वर्षाखालील मुलांनाच एन्ट्री असणार आहे.

गेल्याच आठवड्यात अमेरिकेत फेसबुकने हे नवे अॅप लाँच केले असून त्याला मिळणाऱ्या प्रतिसादानुसार इतर देशांमध्येही लाँच करण्यात येणार आहे. लाईफस्टेज असे या नव्या अॅपचे नाव असून, या अॅपवर फक्त २२ वर्षांखालील मुलांनाच चॅट करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे, या नव्या अॅपवर लॉगइन करण्यासाठी २२ वर्षाखालील तरुण-तरुणींवर फेसबुकवर अकाउंट असण्याची गरज नाही. या अॅपवर इतर वयोगटातील तरुण-तरुणींना केवळ स्वत:ची प्रोफाईल पाहता येणार आहे.

मायकल सेमेन या १९ वर्षीय मुलाने फेसबूकचे हे नवे अॅप तयार केले असून फेसबुकच्या लॉचिंगवेळी तो दुसरीत शिकत होता. गेल्या दोन वर्षांपासून तो फेसबूकसाठी काम करत असून सोशल नेटवर्कला वाढवण्याचे विविध प्रकाराचे शिक्षण घेत आहे. फेसबूकने यापूर्वी आपली सोशल नेटवर्किंग साईट 2004 साली अशाच प्रकारे तरुण-तरुणींध्ये लाँच केले होते. त्यानंतर त्याची लोकप्रियता वाढल्याने ते सर्वांसाठी खुले करण्यात आले.

Leave a Comment