नवी ह्युंदाईची इलेंट्रा लाँच

hyundai
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी दक्षिण कोरियाची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी ह्युंदाईने नवी जनरेशनची इलेंट्रा ही कार लाँच केली असून पेट्रोल इंजिन असणा-या या कारची किंमत दिल्लीमध्ये १२ लाख ९९ हजार रुपये असणार आहे. तसेच डिझेल इंजिन असणा-या कारची किंमत १४ लाख ७९ हजार रुपये असणार आहे.

या नव्या इलेंट्रा कारमध्ये इंजिन ऑप्शनसह मिळणार आहे. या कारमध्ये चार सिलिंडरचे २.० लिटरचे पेट्रोल इंजिन देण्यात आले असून तसेच दुस-या कारमध्ये १.६ लिटरचे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. या दोन्ही कारमध्ये ६ स्पीडचे मॅन्युअल आणि ६ स्पीडचे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आले आहेत. या नव्या इलेंट्रा कारच्या 9 पेट्रोल इंजिन असणा-या कार्स लाँच केल्या आहेत. या पेट्रोल कॅटेगिरीमध्ये S, SX, SX AT, SX(O), SX(O)AT समावेश करण्यात आला आहे. तसेच डिझेल मॉडेल्समध्ये S, SX, SX(O), SX(O)AT या वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह SX आणि SX(o) मॉडेल्स उपलब्ध करण्यात आले आहेत. या कारमध्ये टॉप एन्ड वेरियंट सनरुफ, साइड अँड कार्टेन एअरबॅग, प्रंट वेंटिलेटेड सिटस् आणि स्पीड सेसिंग ऑटो डोर लॉक सिस्टिम देण्यात आले आहे.

Leave a Comment