धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे ई-सिगरेटच्या वापराने

e-cigarate
मुंबई: बंगळुरुच्या संशोधनकर्त्यांनी ई-सिगरेटचा वापराने धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा केला आहे. तसेच इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रेणेने ई-सिगरेट ९५% सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. ई-सिगरेटची गुणवत्ता आणि त्यातील वैविध्यामुळे, शिवाय त्यावर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण कमी असल्याने गेल्या काही वर्षात धूम्रपानाच्या प्रमाणात घट झाल्याचे नमुद केले आहे.

याशिवाय अमेरिकेतील रिजन फाउंडेशनने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, जर ई-सिगारेटचा वापर वाढवल्यास आगामी २० वर्षात धम्रुपानाचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होईल. तसेच ३० वर्षात हे प्रमाण शून्यावर जाऊ शकेल असे म्हटले आहे. बंगळुरुच्या प्रेसीडेन्सी विश्वविद्यालयाचे बोर्ड ऑफ गव्हर्नरचे सदस्य आमीर उल्ला खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १० वर्षात ई-सिगरेटची गुणवत्ता, परिणामकारकता आणि सुरक्षा यामध्ये चमत्कारिक वाढ झाली आहे. तसेच याचा किंमतही कमी असल्याने लाखो धूम्रपान करणारे नागरिक याचा वापर करु लागले आहेत.

जवळपास १०% धुम्रपान करणारे नागरिक गेल्या काही वर्षापासून ई-सिगारेटचा वापर करत आहेत. याच्या वापराने तब्बल १.१कोटी लोकांना लाभ होत असून यामुळे तंबाखुशी संबंधित आजारापासून मुक्ती मिळेल, असा अंदाज भारतीय संशोधनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या संशोधकानी पुढे असेही नमुद केले आहे की, भारतातील अनेक राज्यात ई-सिगरेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे धुम्रपान करणाऱ्या नागरिकांचे आयुष्य वाचवण्यासाठी हे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही आहे. तर दुसरीकडे जगातील संघटना आणि सरकारांचा ई-सिगरेटवर भर असून याच्यामाध्यमातून निकोटीनच्या धोक्यापासून वाचण्याऐवजी धूम्रपानाची सवय घालवण्यासाठी आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment