कार्बनने लाँच केला के९ विराट

karbonn
नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी भारताची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी कार्बनने नवा के९ विराट हा स्मार्टफोन लाँच केला असून ४७९९ रुपये या स्मार्टफोनची किंमत असणार आहे. हा स्मार्टफोन स्नॅपडिल या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी शॅम्पेन गोल्ड आणि ग्रे कलरमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये ५.५ इंचाचा HD IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर १.३ GHz क्वॉड कोर मीडियाटेकचा प्रोसेसर, Cool UI ८.० बेस्ड ओन एंड्रॉयड ६.० मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टम, १ जीबी रॅम, ८जीबी इंटरनल स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे. याचा रिअर कॅमेरा ५ मेगा पिक्सलचा LED फ्लॅशसह आणि फ्रंट कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. याची मेमरी ६४ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. यात WiFi (802.11 b/g/n), ब्लूटूथ, GPS, माइक्रो USB पोर्ट अशा विविध कनेक्टीव्हिटी देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment