बँक आणि टपाल कार्यालयामधुनही मिळणार रेल्वे तिकीट

railway-reservation
नवी दिल्ली- आता आणखी एक पर्याय रेल्वे तिकीट काढण्यासाठी उपलब्ध होणार असून बँक आणि टपाल कार्यालयामधुनही लवकरच तुम्ही रेल्वे तिकीट काढू शकणार आहात.

ही सुविधा सुरवातीला उत्तर मध्य रेल्वे उपलब्ध करुन देणार आहे. बॅंकेतुन केवळ आरक्षितच नव्हे तर अनारक्षित तिकीट देखील काढता येणार आहे. बॅंकांमध्ये यासाठी मशिन बसविण्यात येणार आहेत. स्टेट बॅंक ऑफ इंडियाशी याबाबत करार करण्यात येणार असल्यामुळे रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी कमी करण्यासही मदत होणार आहे. महाराष्ट्रातील ३१ टपाल कार्यालयांमध्ये सुरुवातीला ही सुविधा देण्यात येणार आहे.

Leave a Comment