सोशल मीडियावर येणार झारखंडमधील छोटेसे गाव

social-media
जमशेदपुर (झारखंड) – डिजीटल इंडिया योजनेअंतर्गत झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील एक छोटेसे गाव हिराचुनीची निवड करण्यात आली आहे. जमशेदपूरपासून २३ किमी लांब असणाऱ्या या गावाचे स्वतःचे फेसबुक पेज आणि व्हॉट्सअॅप ग्रुप देखील असणार आहे. त्याचबरोबर येथील प्रत्येक रहिवाशांकडे स्वतःचा मेल आयडी देखील असणार आहे.

२०११च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसख्या अवघी ३०० आहे. याबाबत माहिती देताना पश्चिम सिंहभूम जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले, आम्ही डिजीटल इंडिया योजनेंतर्गत या गावाची निवड केली असून लोकसंख्येनुसार येथील साक्षर लोकांची संख्या देखील त्याच प्रमाणात आहे. त्याचबरोबर याना देण्यात येणाऱ्या ईमेल आयडीमध्ये सर्वात आधी गावाचे नाव त्यानंतर गावातील रहिवाशायाचे नाव देण्यात येणार आहे. या गावाच्या फेसबुक पेजचे नाव डिजीटल हिराचुनी असे असेल.

Leave a Comment