श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा डंका

india
नवी दिल्ली – जगात भारताने पुन्हा एकदा आपल्या नावाचा श्रीमंत देशांच्या यादीत समावेश करून डंका पिटला आहे. भारताने कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटाली यासारख्या देशाना मागे टाकत टॉप टेन श्रीमंत देशांच्या यादीत सातवे स्थान प्राप्त केले आहे. भारतीयांसाठी ही अच्छे दिनची सुरुवात आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

न्यू वर्ल्ड वेल्थने जाहीर केलेल्या अहवालानुसार सातवे स्थान पटकावणार्‍या भारताची वैयक्तिक संपत्ती ५,६०० अरब डॉलर्स एवढी असून यादीत पहिल्या स्थानावर अमेरिका आहे. कॅनडा (४७०० अरब डॉलर्स), ऑस्ट्रेलिया (४५०० अरब डॉलर्स) व इटाली (४४०० अरब डॉलर्स) यांच्या आधी भारताचा क्रमांक असून हे तीन देश अनक्रमे आठ, नऊ व दहाव्या स्थानावर आहेत, हे विशेष.

पहिल्या स्थानावरील अमेरिकेची संपत्ती ४८,९०० अरब डॉलर्स असून चीन हा १७,४०० अरब संपत्ती असल्याने दुसर्‍या व १५,१०० अरब डॉलर्स संपत्तीमुळे जपान यादीत तिसर्‍या स्थानावर असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. चौथ्या स्थानावर ब्रिटन (९,२००), जर्मनी (९,१००) पाचव्या, फ्रान्स (६६००अरब डॉलर्स) सहाव्या स्थानावर आहे. या यादीत भारताचे सातवे स्थान त्याच्या लोकसंख्येमुळे आहे. मात्र ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या फक्त २.२ कोटी असूनही त्याचे नाव या यादीत आहे, ही बाब महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Comment