दिल्लीत उघडली औषधांची एटीएम

atm
नवी दिल्ली – आजवर आपण पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर करत आलो आहोत. पण आता पहिल्यांदाच देशात औषधांचे एटीएम सुरु झाले आहे. दिल्ली सरकारच्या तोदापूर येथील आम आदमी मोहल्ला क्लिनिकमध्ये प्रायोगिक तत्वावर औषधांचे एटीएम बसवण्यात आले आहे. ‘मेडिसिन वेंडिंग मशीन’ असे एटीएमचे नाव आहे.

‘मेडिसिन वेंडिंग मशीन’ला डॉक्टरने दिलेल्या औषधांची यादी दाखवल्यास हे एटीएम आपल्या तात्काळ औषधे देत आहे. याबाबत माहिती देताना मोहल्ला क्लिनिकचे डॉक्टर आर. पाल म्हणाले, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन कम्प्युटर जनरेटेड असून त्यावर एक विशेष प्रकारचा बारकोड देण्यात आला आहे. ज्यामुळे हे मशीन डॉक्टरांनी सांगितलेली औषधे रुग्णाला देण्यात येतात.