भारतीय बाजारपेठेत दाखल झाला स्वाइपचा कनेक्ट प्लस

swipe
नवी दिल्ली – स्वाइप टेलेकॉमने स्वस्त किमतीत स्मार्टफोन सर्वसामान्यांना मिळावा यासाठी कनेक्ट प्लस हा फोन बाजारात आणला असून तो स्नॅपडीलवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. ३ जी सेवा देणारा हा फोन १० तासांपर्यंत टॉकटाइम आणि 220 तासांपर्यंत स्टॅन्डबाय टाइम देऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. या फोनची किंमत केवळ ४९९९ रुपये आहे.

या फोनमध्ये ५ इंच एचडी डिस्प्ले, मीडियाटेक क्वॉड कोअरचा प्रोसेसर, १३ मेगापिक्सलचा रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर १६ जीबीची स्टोरेज क्षमता, २ जीबी रॅम आणि ऍन्ड्रॉइड ५.१ ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे.

Leave a Comment